

शिर्डी : वर्षानुवर्षे सुरू असलेली गुन्हेगारी आणि फसवाफसवीच्या घटनांसाठी साईबाबांची शिर्डी प्रसिद्धीस पावते आहे. हे कमी होते म्हणून काल एका तोतयाने शिर्डीतला शिक्षक आहे, असे सांगून मलाच गंडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा किस्सा आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितला.