रावसाहेब देशमुख सर्वसामान्यांचे आधारवड होते

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

सर्वसामान्य जनतेसाठी ते खरे आधारवड होते. त्यांची राजकीय कारकीर्द उत्तम होती,'' असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त तालुका विकास अधिकारी जनार्दन मोढळे यांनी केले.

राशीन : ""(स्व.) रावसाहेब देशमुख यांनी राशीनचे सरपंचपद चाळीस वर्षे सांभाळताना दूरदृष्टी दाखविली. त्यामुळे त्यांनी केलेली विकासकामे आजपर्यंत टिकली.

सर्वसामान्य जनतेसाठी ते खरे आधारवड होते. त्यांची राजकीय कारकीर्द उत्तम होती,'' असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त तालुका विकास अधिकारी जनार्दन मोढळे यांनी केले. 
(स्व.) देशमुख यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी बापूराव जगताप होते. सरपंच नीलम साळवे, देशमुख संस्थेचे अध्यक्ष तुकाराम सागडे, संचालक वैभव काळे, सदाशिव मासाळ, दिलीप आच्छा, मधुकर दंडे, भीमराव साळवे, दीपक थोरात, ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. के. कानगुडे, अतुल कानगुडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी सरपंच साळवे, दिगंबर कांबळे, दीपक थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करून मुख्य कार्यकारी अधिकारी एम. के. कानगुडे यांनी आभार मानले. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Deshmukh was the supporter of the common man