
श्रीगोंदे : निमगाव खलू (ता. श्रीगोंदे) येथील प्रस्तावित सिमेंट निर्मिती प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्याबाबत हजारो शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हरकती नोंदवल्या आहेत. त्याची दखल घेऊन हा सिमेंट निर्मिती प्रकल्प रद्द करावा; अन्यथा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आक्रमक आंदोलन उभारू, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.