नगरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

कापरे यांची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्‍ती करण्यात आली होती. या कामादरम्यान त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला.

अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केला म्हणून नगरपंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने निलंबित केले आहे.
 
कापरे यांची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्‍ती करण्यात आली होती. या कामादरम्यान त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे तातडीने निलंबन केले. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravindra Kapare Group Education Officer in charge of Nagar Panchayat Samiti has been immediately suspended by the Returning Officer