
येत्या नगरपंचायत निवडणुकीत दोन जागा द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक झारेकरी यांनी केली आहे.
कर्जत (अहमदनगर) : मुस्लिम समाज कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीबरोबर राहिला आहे. मात्र, त्यांना उचित स्थान दिले जात नाही. त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीत दोन जागा द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक झारेकरी यांनी केली आहे.
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जकी सय्यद, अल्ताफ कुरेशी, फझल सय्यद, जब्बार शेख, भय्या झारेकरी, इन्नूस कुरेशी, मुश्ताक सय्यद, सुफिया सय्यद, रिजवान पठाण, समीर शेख आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, पक्षाच्या ध्येयधोरणानुसार मुस्लिम समाज महाविकास आघाडीबरोबर प्रामाणिकपणे राहिला असून, यापुढेही राहील, यात शंका नाही. मात्र, शहरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज असतानादेखील त्याची दखल पक्षाकडून घेतली जात नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षासाठी दोन जागा द्याव्यात. तेथे मोठ्या मताधिक्याने उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे.'