esakal | उंबरे येथे सरपंचपदासाठी काढण्यात आले फेरआरक्षण; निवडणुकीत यंदा सत्तांतर

बोलून बातमी शोधा

Re reservation was made for the post of Sarpanch at Umbre}

उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा सत्तांतर झाले.

उंबरे येथे सरपंचपदासाठी काढण्यात आले फेरआरक्षण; निवडणुकीत यंदा सत्तांतर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : उंबरे येथील सरपंचपदासाठी फेरआरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षण निघाले. मात्र, बहुमतातील दुशिंग गटाकडे या प्रवर्गातील सदस्य नाही. त्यामुळे विरोधी ढोकणे-अडसुरे गटाला सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. त्यांच्या गटाचे सुरेश साबळे यांची सरपंचपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा सत्तांतर झाले. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे व माजी संचालक सुनील अडसुरे यांच्या सत्ताधारी गटाला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी दुशिंग गटाचे नऊ उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण निघाले. मात्र, दोन्ही गटांकडे या प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले.
 
सरपंचपदासाठी फेरआरक्षणाची सोडत झाली. त्यात अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी फेरआरक्षण निघाले. बहुमत असतानाही दुशिंग गटाकडे या प्रवर्गातील सदस्य नसल्याने, सरपंचपदावरील दावा सोडावा लागला. ढोकणे-अडसुरे गटाचे सुरेश साबळे अनुसूचित जमाती प्रवर्गातून विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची आता सरपंचपदावर वर्णी लागणार आहे. दुशिंग गटाला बहुमत असूनही उपसरपंचपदावर समाधान मानावे लागणार आहे.