esakal | Jayant Patil : ‘सीना’चे फेरसर्वेक्षण करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil : ‘सीना’चे फेरसर्वेक्षण करणार

Jayant Patil : ‘सीना’चे फेरसर्वेक्षण करणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे, तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सीना नदीच्या पूरनियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदामंत्री जयंत पाटील नगर दौऱ्यावर आले असता, त्यांनी जिल्हा प्रशासनाला पूरनियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर मंत्री पाटील यांनी सीना नदीपात्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप, किरण लहामटे, माजी आमदार नरेंद्र घुले, उपमहापौर गणेश भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, संजय शेंडगे यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, अभियंता, पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, की सीना नदी पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. याच पार्श्‍वभूमीवर आज मंत्री पाटील नगर शहराच्या दौऱ्यावर आले तेवा जिल्हा प्रशासनास फेरसर्वेक्षण करण्याचा आदेश देऊन त्यांनी नदीपात्राची पाहणी केली. सीना नदीचा उगम नगर शहराजवळच (जेऊर) होतो. सीना नदीला मोठा पूर येऊन कुठल्याही प्रकारची वित्तहानी झालेली नाही. सध्या सीना नदी पूररेषेचे अंतर ५०० मीटर असल्याने, शहरविकासाला गती देण्यात मोठी अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी पूररेषेचे फेरसर्वेक्षण होणे गरजेचे आहे, जेणेकरून नगर शहरातील ३० टक्के नागरिकांना याचा लाभ होईल. याचबरोबर सीना नदीपात्राचे खोलीकरण करून पात्राभोवती असलेली अतिक्रमणे काढावीत, असे ते म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करू

सीना नदीपात्रातील अतिक्रमणे काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्याची गरज आहे. त्यानंतर नदीपात्रालगत सुशोभीकरण करून शहराच्या वैभवात भर घालण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय उपस्थित करू, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top