शनिशिंगणापूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

नाताळ सणाच्या सलग सुट्ट्या असल्याने शनिभक्तांचा ओघ वाढलेला आहे. आज सकाळी आठ वाजता सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत टिकून होती. महाद्वार परिसराला यात्रेचेच स्वरूप आले होते.

सोनई : कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन शनैश्‍वर देवस्थानने दिवसभरात सहा हजार भाविकांनाच दर्शन देण्याचा केलेला नियम आज मोडीत निघाला. दिवसभरात सत्तर हजारांहून अधिक भाविकांनी गर्दी करीत शनिदर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसरात उच्चांकी गर्दी पहायला मिळाली. 

नाताळ सणाच्या सलग सुट्ट्या असल्याने शनिभक्तांचा ओघ वाढलेला आहे. आज सकाळी आठ वाजता सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत टिकून होती. महाद्वार परिसराला यात्रेचेच स्वरूप आले होते.

येथे गर्दी अधिक आणि नियंत्रण करणारे सुरक्षा कर्मचारी व पोलिस यंत्रणा तोकडी पडली. लहान मुले व वयस्कर भक्तांना कुठलीही अडवणूक झाली नाही. उदासी महाराज मठ व शनिचौथरा येथे सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडाला. 

आठ महिन्यानंतर प्रथमच व्यावसायिकांना आजचा शनिवार दिलासादायक ठरला. सोनई, घोडेगाव रस्त्यावर व गावात पोलिस ठाण्यासमोर लटकू सक्तीची अडवणूक करत असताना कुणावरही कारवाई झाली नाही हे विशेष. प्रवेशद्वारात अनेक भक्त मास्क न लावता दिसले. हात-पाय धुणे व हातावर कुणीही सॅनेटायझर मारताना दिसले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record crowd of devotees for darshan in Shanishinganapur