Video : अडीच वर्षांचे असताना तुम्ही काय करीत होता... ही बघा काय करतेय

अमित आवारी
Saturday, 20 June 2020

अडीच वर्षांचे असताना आपण काय केले हे नीट आठवतसुद्धा नाही. तुमचे बालपण आठवण नसेल तर जाऊ द्या परंतु ही चिमुरडी काय करतेय पहा.

नगर : लहान मुलं म्हटले की ते घरात नेहमीच खेळण्यांचा पसारा पडलेला असतो. परंतु कल्याण रस्त्यावर राहणाऱ्या मुळे कुटुंबियांच्या घरातील "राजवी'मध्ये जन्मातच असलेल्या छंदामुळे घरात नेहमीच गाद्यांचा पसारा पडलेला असतो. अडीच वर्षांच्या "राजवी'च्या योगाच्या धड्यांमुळे तिची वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेतलेली आहे. 

लंडनच्या वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकीत पुस्तकात नगर येथील अवघ्या अडीच वर्षांची योगतज्ञ राजवी मुळे हिची जगातील सर्वात लहान वयात योगासने करणारी मुलगी म्हणून नोंद झाली आहे. श्वेता आणि हर्षद मुळे या इंटेरिअर डिझायनर ऍन्ड कन्सल्टंट या दांपत्याची ही मुलगी आहे.

मागील वर्षी अभिनेता अजय देवगण यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा स्लीट स्ट्रेचरिंग करतानाचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर ठेवला होता. मुळात योगासने म्हणजे काय हेच तिला माहित नाही. लवचिक शरीराच्या मिळालेल्या दैवी देणगीवर ती योगाच्या आत्मखेळात मग्न असते. वयाच्या सहाव्या महिन्यापासून तिने खेळता खेळता स्वतःच्या मनाने वेगवेगळी आसने करण्यास सुरवात केली. आता तिचे सेतू बंधासन, हलासन, वृक्षासन, धनुरासन, शिर्षासन असे वेगवेगळी आसने करत आहे. हे पाहुन तिच्या आई-वडिलांनी नगरमधील योगासनांच्या बऱ्याच क्‍लासेसमध्ये मार्गदर्शकांचा शोध घेतला, परंतु कमी वयामुळे कोणीही मार्गदर्शक मिळाला नाही. 

तिचे आईवडिलांनी तिचे गुण हेरुन पुढे तिच्या गुणांचा विकास होण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. राजवी घरातील उंच वस्तूंवर चढून त्यावर योगासने करते. त्यावरून उड्या मारते. स्ट्रेचिंग करते. घरातील छोट्या घसरगुंडीवरून स्ट्रेचिंग करत घसरत येते. यात तिला इजा होऊ नये यासाठी घरातील तिला उभे राहता येईल अशा उंच वस्तूंजवळील जमिनीवर गाद्या अंथरण्यात आलेल्या आहेत. राजवीची ही योगासने पाहून तिच्या आई-वडिलांनी एक दिवस वर्ड रेकॉर्डचा अर्ज भरला. अर्ज भरुन सगळ्या परीक्षकांच्या नजरेतून परीक्षण झाल्यानंतर लंडनच्या वर्डबुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून राजवी ही योगासने करणारी जगातील वयाने सर्वात लहान मुलगी ठरली आहे. 

बाळाला जन्म देणे म्हणजे एका आईचा दुसरा जन्म होणे असते. राजवीमुळे खरोखर माझा दुसरा जन्म सार्थक झाला. ती भविष्यात कोणतेही क्षेत्र निवडो, ती त्यात नक्कीच सर्वोत्कष्ट कामगिरी करेल. राजवीला कोणी उत्तम प्रशिक्षक मिळणे आवश्‍यक आहे. 
- श्‍वेता मुळे, राजवीची आई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recorded in the Word Book due to the age of play