गुड न्यूज! नगर जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेनऊ हजाराहून अधिक

दौलत झावरे
Saturday, 15 August 2020

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९५०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७६.७३ टक्के इतकी आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९५०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७६.७३ टक्के इतकी आहे.

दरम्यान, शुक्रवार सायंकाळी सहा वाजले पासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७३० इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०९, संगमनेर एक, पाथर्डी एक, नगर ग्रामीण चार, श्रीरामपूर सहा, कॅन्टोन्मेंट चार, अकोले एक, शेवगाव एक, मिलीटरी हॉस्पिटल एक अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज एकूण ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा १९३, संगमनेर १८, राहाता १६, पाथर्डी ६१, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट २१, नेवासा नऊ, श्रीगोंदा २१, पारनेर १४, अकोले १९, राहुरी १७, शेवगाव सहा, कोपरगाव २०, जामखेड पाच, कर्जत ३६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत बरे झालेली रुग्ण संख्या : ९५०५

उपचार सुरू असलेले रूग्ण : २७३०

मृत्यू : १५३

एकूण रूग्ण संख्या:१२३८८

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovering patients in Nagar district is more than nine thousand