"पीएम किसान"चे पैसे लाटणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा

Recovery of money from rich farmers started
Recovery of money from rich farmers started
Updated on

पारनेर ः तालुक्‍यातील करपात्र, नोकरदारांसह एकाच कुटुंबातील अनेकांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. सध्या या रकमेची वसुली सुरू आहे.

आतापर्यंत 82 लाख 12 हजार रुपये वसूल झाले आहेत. दुसरीकडे कागदपत्रांअभावी 3630 शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटी दुरुस्त करुन त्यांना तातडीने लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता ग्रामसेवक वा कृषी अधिकाऱ्यांनी करुन घ्यायची आहे. 

तालुक्‍यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी 63 हजार 442 लाभार्थी आहेत. मात्र, कर भरणारे, नोकरदार, 20 हजारांपेक्षा अधिक निवृत्तीवेतन घेणारे, तसेच एकाच कुटुंबातील अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते.

सरकारच्या आदेशानुसार, त्यांच्याकडून योजनेतील रकमेची वसुली सुरू केली आहे. दुसरीकडे योजनेसाठी अर्ज करूनही अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले. त्यात मुख्यत: आधार लिंक नसणे, बॅंक खाते क्रमांक किंवा आयएफसी कोड चुकीचा असणे, या कारणांनी अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले. या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे. योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन देवरे यांनी केले आहे. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थींनी तातडीने रक्कम भरावी. योजनेची रक्कम त्वरित न भरल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. 
- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर 

  • पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना दृष्टिक्षेपात 
  • पात्र लाभार्थी- 63 हजार 442 
  • वंचित लाभार्थी- 3 हजार 630 
  • अपात्र शेतकरी- 2 हजार 688 
  • वसूल करायची रक्कम- 2 कोटी 33 लाख 42 हजार 
  • आतापर्यंत वसूल- 82 लाख 12 हजार .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com