कोरोना काळात रूग्णांकडून उकळलेली वाढीव बिले रद्द करा, मनसे आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

या संदर्भात तीन कार्यवाही करण्याची नोटीस संबंधित रुग्णालयांना देण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्‍त मायकलवार यांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

नगर ः शहरातील खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून आकारलेली वाढीव बिले परत करावी, या मागणीसाठी आज महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्या दालनात झोपून आंदोलन केले.

या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, मनोज राऊत, अशोक दातरंगे, पोपट पाथरे, गणेश शिंदे, तुषार हिरवे, अमोल बोरूडे आदी सहभागी झाले होते.

या संदर्भात तीन कार्यवाही करण्याची नोटीस संबंधित रुग्णालयांना देण्यात येईल, असे आश्‍वासन आयुक्‍त मायकलवार यांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वाढीव बिलांची चौकशी समिती नेमून बिलांसंदर्भात कार्यवाही करून रुग्णांच्या खात्यावर बिलांची वाढीव रक्‍कम जमा करण्याचे आदेश संबंधित 13 रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत. याला दोन महिने होऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduce the increased bills incurred by patients during the corona period