
जामखेड : गळफास घेतल्याचा रिल बनविण्याच्या नादात जामखेडला एकाला फाशी बसली. मात्र, वेळीच लक्ष दिल्याने या युवकाचे प्राण वाचले आहेत. जामखेड शहरालगत करमाळा रस्त्यावरील खटकळीच्या नाल्यात मुख्य रस्त्यापासून साधारण ५०० मीटर अंतरावर रिल बनवत असताना फाशीचे नाटक केले असता, गळफास बसला. या सर्व घटनाक्रमाचा त्याच्या नातेवाईक साथीदाराने व्हिडिओ सुद्धा काढला आहे. एका अल्पवयीन मुलगा शहरातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत आहे.