
अहिल्यानगर : अखिल भारतीय नाट्य परिषदेचा शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगर उपनगर शाखेला मिळाला आहे. २६ व २७ जानेवारी रोजी हे विभागीय नाट्य संमेलन अहिल्यानगरमध्ये माऊली सभागृह व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. संमेलन नगरकर रसिकांसाठी पर्वणी असेल, अशी माहिती निमंत्रक आमदार संग्राम जगताप यांनी दिली.