कोरोनाने व्यापाऱ्याचा मृत्यू; नगरमध्ये ६३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

अशोक निंबाळकर
Sunday, 12 July 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. तर एका व्यापाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. तर एका व्यापाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा तालुक्यातील एक, जामखेड तालुक्यातील एक आणि पुणे जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी येथील पाच, नवघर गल्ली येथील एक तसेच संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील दोन, खांडगाव, , चिखली येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळून आला आहे. नेवासा तालुक्यातील गुंडगाव येथील एक, जामखेड तालुक्यातील लोणी (खर्डा) येथील एक रुग्ण बाधित आढळले आहेत. नगर शहरात गुलमोहर रोड, आशा टॉकीज आणि सारसनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
विश्रांतवाडी (पुणे) येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४७ रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३४, कोपरगाव एक,  नगर ग्रामीण एक, पारनेर एक, राहाता तीन, संगमनेर चार आणि श्रीरामपूर येथे दोन रुग्ण बाधित आढळले आहेत.

उपचार सुरू असलेले रुग्ण: ३१९
बरे झालेले रुग्ण: ५६८
मृत्यू: २०
एकूण रुग्ण संख्या: ९०७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

संपादन : अशोक मरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration of 63 corona disease patients in Ahmednagar District