रिलायन्स मॉल विनापरवाना उघडला, पालिकेने ठोकला दंड

Reliance Mall opened without permission fined by the municipality
Reliance Mall opened without permission fined by the municipality
Updated on

कोपरगाव : जिल्ह्यात संचारबंदी, लॉकडाउन सुरू असताना, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, शासनाची कुठलीही परवानगी न घेता, शहरातील मध्यवस्तीतील रिलायन्स ट्रेंड्‌स मॉलमध्ये काम करताना व्यवस्थापनासह नऊ कर्मचारी आढळून आले. पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली असता, हे सर्व जण नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. सरोदे यांनी या मॉलला तात्काळ पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जीवनाश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे मॉल्स बंदच ठेवण्याचा आदेश आहे. असे असताना, कोपरगाव शहरातील रिलायन्स मॉल कोणतीही परवानगी नसताना उघडल्याने पालिकेच्या पथकाने तातडीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले. 

अंतर्गत कामांसाठी उघडला

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचना व स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार मॉल व शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील दुकाने सुरू ठेवू नयेत, असे आदेश आहेत. या नियमांचे आजपर्यंत सर्वच कोपरगावकर पालन करीत आले आहेत. परंतु, गुरुवारी (ता.7) रिलायन्स ट्रेंड्‌स हा कपड्यांचा मॉल प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता, आपल्या अंतर्गत कामांसाठी उघडला होता. त्यामुळे पालिकेने मॉलवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. 

परवानगी घेतली नव्हती

याबाबत मॉलचे मॅनेजर सुनील कुंटे म्हणाले, की कर्मचाऱ्यांचे पगार व काही अंर्तगत कामांसाठी मॉल आतून बंद ठेवून काम केले. पण, याबाबत प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com