esakal | रिलायन्स झाले उदार! रूग्णवाहिका-अॉक्सीजन वाहनांना मोफत इंधन
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल

रिलायन्स झाले उदार! रूग्णवाहिका-अॉक्सीजन वाहनांना मोफत इंधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मिरजगाव (अहमदनगर) : कोरोना काळात ऑक्सीजन वाहतूक करणारे वाहन व कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिकांना मोफत इंधन मिळणार आहे. नगर-सोलापूर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना ही सुविधा मिळणार आहे. रिलायन्स बी.पी. मोबिलिटी कंपनीने हे दातृत्त्व दाखवले आहे.

दररोज 50 लिटरपर्यंत मोफत इंधन देण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरूवात मिरजगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर करण्यात आली आहे, अशी माहिती पंपचालक डॉ संतोष गरसुळे यांनी दिली. नगर-सोलापूर, राशीन-नगर या सोबतच परिसरातील मार्गांवरून जाणाऱ्या सर्वच रुग्णवाहिकांना याचा फायदा होणार आहे. (Reliance will provide free fuel to ambulances)

हेही वाचा: लतादीदी नगरच्या डॉक्टरला म्हणाल्या, सदा सुखी रहा...

जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र सादर करणाऱ्या नोंदणीकृत खासगी किंवा सरकारी रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणारे वाहने या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. आजपर्यंत 4 हजार लिटर डिझेलचे वितरण मिरजगावमधून करण्यात आले आहे.

"सामाजिक बांधिलकीतून रिलायन्स बी.पी. मोबिलिटी कंपनीच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परिसरातील जास्तीत जास्त रुग्णवाहिका चालकांनी या योजनेचा फायदा घ्यावा. कंपनीच्या मिरजगाव येथील पंपावर

24 तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे. योजनेसंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास मिरजगाव येथील कार्यालयात संपर्क साधावा."

-डॉ संतोष गरसुळे (रिलायन्स पंप चालक) (Reliance will provide free fuel to ambulances)