नगर जिल्ह्यात या ४५ ठिकाणी आहेत रेमडेसिवीर इंजेक्शन

Remedesivir injection is available at 45 places in Nagar district
Remedesivir injection is available at 45 places in Nagar district

नगर ः कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक असणारे रेमडेसिवीर औषध जिल्ह्यातील 45 औषधालयांमध्ये उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना या औषधाची गरज आहे, त्यांनी संबंधित दुकानांशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषधे प्रशासनाच्या सहायक आयुक्‍त कार्यालयाने केले आहे. 
संगमनेर तालुक्‍यातील श्री बालाजी एजन्सी, न्यू अनुकृपा मेडिकल, ओम गगनगिरी मेडिकल, अर्चना मेडिकल, साईकृष्ण मेडिकल, साईदत्त मेडिकल, ड्रग हाउस, महेश मेडिकल, आर. डी. सर्जिकल या दहा ठिकाणी औषध कोरोना रुग्णांना मिळणार आहे. श्रीरामपूर तालुक्‍यात तीन ठिकाणी औषध उपलब्ध आहे. यामध्ये गोविंद एजन्सी, डॉ. मोरगे हॉस्पिटल व अल्ला हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्‍यातील जव्हार एजन्सी, चंद्रज्योत फार्मा, हेम एजन्सी, साई संकेत फार्मसी, गुरुकृपा मेडिकल, तीर्थंकर मेडिकल, एसजेएस मेडिकोज, श्री मेडिकोज, सिटी केअर मेडिकल्स या दहा ठिकाणी औषध उपलब्ध राहणार आहे. राहाता तालुक्‍यात प्रवरा रूरल हॉस्पिटलमध्ये औषध उपलब्ध आहे. जामखेड तालुक्‍यात ओम मेडिकल या ठिकाणी औषध उपलब्ध आहे. 

नगर शहरातील बोरा एजन्सी, संजीवनी एजन्सी, ऍपेक्‍स फार्मा, साई एशियन मेडिकल स्टोअर्स, साईदीप मेडिकल, आनंदऋषीजी मेडिकल, श्रीनाथ मेडिकल, मॅककेअर हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल, सर्वज्ञ मेडिकल, लोटस मेडिकल, झालानी एजन्सी, गुंदेचा एजन्सी, डॉ. विखे पाटील फाउंडेशन, रॉयल सुपर स्पेशालिटी ड्रग, खेडकर मेडिकल, प्राइम केअर, ऍपेक्‍स फार्मा मेडिकल स्टोअर्स या 18 ठिकाणी हे औषध उपलब्ध आहे. केडगावातील नरेंद्र मेडिकल या ठिकाणीही औषध उपलब्ध आहे. 

प्रशासनाने ही यादी जाहीर केली असली तरी तेथे फोन केला असल्यास लगेच सांगितले जाते, रेमडेसिवीर इंजेक्शनसोडून दुसरे असेल तर बोला. पारदर्शकता आणूनही काळाबाजार होत असल्याचे समोरे येते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com