राहुरी तालुक्यात एक महिन्यानंतर पुन्हा मिळाले सरपंचपद; आता ग्रामसभेकडे लक्ष 

Reslection of Mahesh Gagare as Sarpanch of Mahesgaon in Rahuri taluka
Reslection of Mahesh Gagare as Sarpanch of Mahesgaon in Rahuri taluka
Updated on

राहुरी (अहमदनगर) : भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयाने राहुरी तालुक्यातील म्हैसगावमधील सरपंचाला दिलासा मिळाला आहे. येथे थेट मतदारातून निवडलेल्या सरपंचावर सदस्यांनी अविश्‍वास ठराव आणला होता. मात्र, थेट मतदारातून निवडलेल्या सरपंचावर अविश्‍वास ठराव अणण्याचा अधिकार सदस्यांना नसुन ग्रामसभेला आहे. त्यामुळे एक महिन्यानंतर येथील सरपंचाना पुन्हा पद प्रदान करण्यात आले आहे. 

थेट मतदारातून होणारी सरपंच निवड महाविकास आघाडी सरकारने रद्द केली. त्यामुळे त्या काळात निवडेलेल्या सरपंचांचे भवितव्य धोक्यात आले होते. मात्र, हा निर्णय येणाऱ्या निवडणुकीपासून आहे. त्यामुळे त्याकाळात निवडलेल्या सरपंचावर अविश्‍वास ठराव आणायचा असेल तर सदस्यांचा नव्हे तर ग्रामसभेचा ठराव आवश्‍यक आहे.
राहुरी तालुक्‍यातील म्हैसगावचे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांचे रद्द केलेले सरपंचपद एक महिन्याने म्हणजे सोमवारी (ता. २३) पुन्हा प्रदान करण्यात आले. आता, तहसीलदारांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजित करून, गुप्त मतदान घेतले जाणार असून, त्यावर सरपंच गागरे यांचे भवितव्य ठरणार आहे. 

म्हैसगाव येथे 23 ऑक्‍टोबरला तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत सरपंच गागरे यांच्याविरुद्ध तीनचतुर्थांश बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, तहसीलदार शेख यांनी गागरे यांचे सरपंचपद रद्द करून, त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.

दरम्यान, ग्रामविकास विभागाच्या 28 ऑक्‍टोबरच्या पत्रानुसार, जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचावरील अविश्वास ठरावासाठी विशेष ग्रामसभेची मंजुरी आवश्‍यक असल्याचे कळविण्यात आले. सरपंच गागरे यांच्याविरुद्ध सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव संमत केल्यानंतर, ग्रामसभेची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज (सोमवारी) गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांनी पत्र देऊन, सरपंच गागरे यांना सरपंचपदाचे अधिकार प्रदान केले. 


म्हैसगावचे सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांवर अविश्‍वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलाविण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले. त्यानुसार, गागरे यांना सरपंचपदाचे अधिकार प्रदान केले आहेत. आता विशेष ग्रामसभेचे आयोजन करून, अविश्वास प्रस्तावावर ग्रामस्थांचे गुप्त मतदान घेतले जाईल. 
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com