वाळूचोरांच्या पायाखालची वाळू सरकली ! श्रीगोंद्यात तहसीलदार, पोलिस लागले मागे

Revenue and police have launched a joint operation against illegal sand thieves in Wadgaon Shindodi and Mhase Shivara..jpg
Revenue and police have launched a joint operation against illegal sand thieves in Wadgaon Shindodi and Mhase Shivara..jpg
Updated on

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्यातील वडगावशिंदोडी व म्हसे शिवारात बेकायदेशीर सुरु असणाऱ्या वाळू चोरांविरुध्द अखेर महसूल व पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाईचे हत्यार उपसले. गेल्या १५ तासांपेक्षा जास्त वेळ सुरु असणाऱ्या कारवाईत पथकांनी तेथील सुमारे २५ बोटी फोडल्याची माहिती आहे. कारवाई अजून संपलेली नसल्याने अधिकृत माहिती मिळाली नाही.

वडगावशिंदोडी येथे राहूरी तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावावर मातीमिश्रीत वाळूचा लिलाव घेण्यात आला होता. विशेष म्हणजे ही मंजूरी जिल्हाधिकाऱ्यांनीच दिलेली होती. ही मातीमिश्रीत वाळू कशासाठी लागते हे कारण गुलदस्त्यात राहिले. हा लिलाव घेताना प्रशासनाने संबंधितांना अटी घातल्या होत्या. तेथील नदीपात्रालगतच्या दोन हेक्टर शेतजमिनीत असणारी ही माती मिश्रीत वाळू अर्धा मीटर खोलीपर्यंत उत्खनन काढून करण्याची अट होती. मात्र त्या परिसरात संबंधितांनी नदीपात्रात बोटी सुरु केल्या, यात लिलावधारकाशिवाय इतरांनीही हात धुवून घेण्याचे ठरविले. त्यातच वडगाव येथील गावकऱ्यांनी त्यांच्या हद्दीत कुठलाही लिलाव करता येवू नये असा ठराव केला.

दरम्यान तहसीलदार प्रदीप पवार यांच्याकडे गंभीर तक्रारी आल्यानंतर सोमवारी रात्रीपासून तेथे बेलवंडी पोलिसांचे संयुक्त पथकाची कारवाई सुरु आहे. आज सांयकाळपर्यंत ही कारवाई सुरु होती. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, अजून कारवाई सुरु असून सुमारे पंचवीस बोटी फोडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com