खासदार अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले

आनंद गायकवाड
Wednesday, 25 November 2020

आपल्या स्पष्ट राजकीय भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहिताला प्राधान्य व देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद ही त्यांची खासियत होती. या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. या निरपेक्ष सैनिकाचा राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते. त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध असल्याने, त्यांच्या निधनाने वैयक्तिक व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे दुःख थोरात यांनी व्यक्त केले आहे.

संगमनेर (अहमदनगर) : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावल्याच्या भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

वयाच्या 26 व्या वर्षी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. कोणत्याही राजकीय पेचप्रसंगात कॊशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार अशी त्यांची ओळख होती. तीन वेळा लोकसभा व पाच वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून ते निवडून गेले. अनेकवेळा मंत्रीपदाची संधी न स्वीकारता निरपेक्ष भावनेने पक्ष संघटनेत काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूतीसाठी मोठे योगदान दिले आहे. 

आपल्या स्पष्ट राजकीय भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहिताला प्राधान्य व देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद ही त्यांची खासियत होती. या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. या निरपेक्ष सैनिकाचा राज्यातील विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते. त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध असल्याने, त्यांच्या निधनाने वैयक्तिक व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे दुःख थोरात यांनी व्यक्त केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revenue Minister Balasaheb Thorat said that the demise of MP Ahmed Patel has lost an experienced loyal and dedicated leadership