लॉकडाउनबाबत महसूलमंत्री थोरातांनी दिले हे संकेत

Revenue Minister Thorat warned of a lockdown
Revenue Minister Thorat warned of a lockdown
Updated on

संगमनेर ः भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यातल्या मंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज वाटत नाही, त्यांना नियतीने दिलेली विरोधी पक्षाची भूमिका ते बजावताहेत, अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

आज सकाळी संगमनेरात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काल विखे यांनी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांसह चार मंत्र्यांचे दुर्लक्ष झाल्याचे वक्तव्य केले होते. 

ते म्हणाले, देशासह राज्यावर आलेल्या कोरोनाच्या भीषण संकटातही काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे दुर्दैवी आहे. वास्तविक अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वपक्षीय मतभेद विसरुन, सर्वांनी एकत्र येत लढा देण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या निर्णयाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. जगासह देश व राज्यात कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत आहे.

या बाबत राज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्री जातीने लक्ष घालून निर्णय घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबवणे नवीन संसर्ग होवू न देणे व मृत्यू रोखण्याचा अंतिम उद्देश आहे. यासाठी काही प्रमाणावर बंधने आणली आहेत. तरीही काळजी वाटते आहे. यावर विरोधी पक्षासह सरकारमधील महत्वाच्या नेत्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. मृत्यूदर शून्य होण्याच्या उद्देशाने आवश्यक ते सर्व निर्णय़ घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात दोन दिवसात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे निर्माण झालेले चित्र भयानक आहे. मात्र हे केवळ नगरमध्येच आहे असे नाही सर्वत्र कोविडनंतर झालेल्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. म्हणून कडक निर्णय घ्यावे लागणार आहेत. 

राज्यातील मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध तर राज्यकर्त्यांचा आग्रह या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, मागील वर्षात व्यापारी बांधवांचे मोठे नुकसान झाले, हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती अतिशय अवघड झाली असली तरी हे मानवतेवरील संकट आहे हे विसरु नये या संकटाला सामेरे जावे लागणार आहे.

कोरोनाच्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व काळाबाजार याबाबत बोलताना ते म्हणाले, कोरोना बाधितांचा आकडा मोठा आहे मात्र कोणाला इंजेक्शनची गरज आहे, कोणाला नाही याबाबतचे काही संकेत पाळावे लागतील. इंजेक्शनची साठेबाजी थांबली पाहीजे. याचे निर्णय होत आहेत. काही खंबीर व भक्कम निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shock in Pune as Minor Girl Dies Before Eye Surgery; Questions Raised Over Hospital Procedure
Medical Negligence Allegations: 6-Year-Old Priyanshi Bagde Dies During Surgery in Pune
Sand Extraction Dispute Leads to Stone Pelting Incident in Rural Rampur
Chitra wagh
Marathi News Esakal
www.esakal.com