esakal | मानलं पाहिजे राव! सरपंचपदाच्या कारकिर्दीतील मानधन कर्मचाऱ्यांना बक्षीस
sakal

बोलून बातमी शोधा

Reward to the honorarium employees during their career as Sarpanch

सरपंचपदाचा अनुभव नसतानाही दोन वर्षांत विविध विकासकामे करून गावकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध केल्या. या कामात ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याची जाणीव ठेवून, दोन वर्षांचे मानधन कर्मचाऱ्यांना बक्षीस देत आहे, असे प्रतिपादन माजी सरपंच विजय पवार यांनी केले.

मानलं पाहिजे राव! सरपंचपदाच्या कारकिर्दीतील मानधन कर्मचाऱ्यांना बक्षीस

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : सरपंचपदाचा अनुभव नसतानाही दोन वर्षांत विविध विकासकामे करून गावकऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध केल्या. या कामात ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याची जाणीव ठेवून, दोन वर्षांचे मानधन कर्मचाऱ्यांना बक्षीस देत आहे, असे प्रतिपादन माजी सरपंच विजय पवार यांनी केले. 

सुपे ग्रामपंचायतीची मुदत नुकतीच संपली. कर्मचारी रफिक शेख, जावेद तांबोळी, सलीम तांबोळी, अरिफ शेख, सुशांत गायकवाड, सागर पवार, योगेश तारडे, अनिता औचिते, मंदा दिनकर, माया शिंदे आदी कर्मचाऱ्यांचा सरपंच विजय पवार व सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, माझ्या काळात ग्रामपंचायतीला "आयएसओ' मानांकन मिळाले, विमाग्राम म्हणून गौरविण्यात आले. कार्यालयाचे सुशोभीकरण, कचरासंकलनासाठी घंटागाडी, पाणवठ्यांची दुरुस्ती व खोलीकरण, चारशे कुटुंबांना 12 हजार रुपयांप्रमाणे शौचालयासाठी अनुदान, नवीन वसाहतींमध्ये बंदिस्त गटार, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, बसस्थानक व बाजारतळावर स्वच्छतागृहांची सोय आदी कामे मार्गी लागली. गावासाठी 14 कोटी 61 लाख रुपये खर्चाच्या पाणीयोजनेस मंजुरी, 50 लाखांचे व्यापारी संकुल आदी कामे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून केली.'' या वेळी उपसरपंच ज्योती पवार, सदस्य दत्तात्रय पवार, किरण पवार, सुनीता नगरे, ग्रामविकास अधिकारी अशोक नागवडे उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर