esakal | अहमदनगर शहरातील रस्ते होणार चकाचक!
sakal

बोलून बातमी शोधा

roads in ahmednagar city will be repaired soon

अहमदनगर शहरातील रस्ते होणार चकाचक!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त होते. आता मात्र आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे लवकरच शहरातील रस्ते चकाचक होणार आहेत. काही कामे पूर्ण झाली, तर सध्या काहींची डागडुजी सुरू आहे. अनेक रस्त्यांचे सिमेंट कॉँक्रिटीकरण होणार आहे. पावसाचा अडथळा येत असला, तरी कामे वेगात सुरू आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून जगताप यांनी पाठपुरावा करून रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील तीन रस्ते, रेव्हेन्यू कँटीनजवळील रस्ता, चांदणी चौक परिसर, अशोका हॉटेल ते रामचंद्र खुंट, इदगाह मैदान, धरती चौक, झेंडी गेट, कोंड्यामामा चौक, चितळे रोड, दिल्ली गेट भागातील नेप्ती रोड, बागरोजा हडको परिसरातील काही रस्ते यापूर्वीच पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा: ठेकेदार संस्कृतीच संगमनेरची ओळख - राधाकृष्ण विखे पाटील


दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा, चितळे रस्ता, डाळ मंडई ते रामचंद्र खुंट, रामचंद्र खुंट ते अशोका हॉटेल, माळीवाड्यातील पाच रस्ते, वाडिया पार्क ते मनपा कार्यालय, शनी चौक ते मनपा, अशा अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही कामे लवकरच सुरू होतील. जुना बाजार, तख्ती दरवाजा, भोपळे गल्ली, फुलसौंदर चौक, हातमपुरा रस्ता, अडते बाजार, गंज बाजार परिसरातील पाच रस्ते, तोफखाना परिसरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.
दरम्यान, आगरकर मळा ते काटवन खंडोबा, स्टेशन चौक आदी रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ९.५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. वीज वितरण कार्यालय ते कोंबडीवाला मळा, तसेच इतर रस्त्यांसाठी १० कोटींची मंजुरी मिळविली आहे. सारसनगरमधील रस्त्यांसाठी दोन कोटी निधी उपलब्ध झाला आहे. निविदा, तसेच इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यांची कामेही सुरू होणार आहेत.


अमृत भुयारीचा अडथळा

पुढील ५० वर्षांचा अंदाज घेऊन तयार झालेल्या अमृत भुयारी गटार योजनेतील कामे लवकरच होणार आहेत. त्यामुळे संबंधित रस्त्यांचे काम लगेचच करता येत नाही, कारण त्या कामासाठी रस्ता पुन्हा उखडला जाईल. त्यामुळे लवकरच अमृत भुयारी गटार योजनेचे कामे पूर्ण करून संबंधित रस्तेही दुरुस्त केले जाणार आहेत.

हेही वाचा: शनिशिंगणापुरातून ‘लटकू’ हद्दपार; पोलिसांची धडक मोहीमयेत्या चार महिन्यांत नगर शहरातील सुमारे ७० टक्के रस्ते नव्याने डांबरीकरण, कॉँक्रिटीकरण होणार आहेत. कामे सुरू असताना वाहतुकीची कोंडी होणे स्वाभाविक आहे. थोडी गैरसोय होईल. सुरू झालेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन असते. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करावे.
- संग्राम जगताप, आमदार

loading image
go to top