नेवासेत येत असाल तर थांबा; ‘हे’ रस्ते राहणार आहेत बंद

Roads in Nevase will remain closed till Friday
Roads in Nevase will remain closed till Friday
Updated on

नेवासे (अहमदनगर) : कामिका एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान येथील 'पैस' खांबाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून लाखो भाविक येतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने यात्रोत्सव रद्द केल्याचे आगोदरच जाहीर केले. दरम्यान तालुका प्रशासनाने गुरुवारी (ता. १६) नेवासे शहर व मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंदचा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त केलेली श्रीक्षेत्र पंढरपूरची वारी ही कामिका एकादशीनिमित्त नेवासे येथील 'पैस'खांबाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे येथील 'माऊलीं'ची वारी चुकत असल्याने वारकरी, भाविक घरीच राहून ज्ञानदेव.. माऊली.. तुकाराम नामाचा गजर करणार आहेत. कामिका एकादशी हा नेवासे तालुक्यातील सर्वात मोठा वारकरी सोहळा. यादिवशी नेवासे, शेवगाव, पैठण, पाथर्डी, गंगापूर, श्रीरामपूर, नगर तालुका या तालुक्यातून माऊलीच्या 'पैस' खांबाचे दर्शनासाठी हजारो वारकऱ्यांच्या शेकडो दिंड्यासह लाखो येत असतात. त्यामुळे येथे मोठा यात्रोत्सव भरत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर मंदिर बंदच ठेवण्यात आलेले आहे. मात्र बाहेरूनच दर्शन घेऊन म्हणून श्रद्धेपोटी भाविक गर्दी करतीलच म्हणून मंदिर संस्थानने आगोदरच यात्रोत्सव रद्द केल्याचे जाहीर करून टाकले आहे. दरम्यान कामिका एकादशीला होणारी गर्दी लक्षात घेता तालुका प्रशासनाने खबरदारी बुधवारी (ता. १५) नेवासे तहसील कार्यालयात प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक रणजीत डेरे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, मुख्याधिकारी समीर शेख, सतीश पिंपळे, युवा नेते संजय सुखधान व संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात नेवासे शहर व मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बुधवार रात्री आठ ते शुक्रवारी सकाळी आठपर्येंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

नेवासेतील ज्ञानेश्‍वर मंदिराचे मुख्य विश्‍वसत शिवाजी महाराज देशमुख म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कामिका एकादशी निमित्त होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. यादिवशी संस्थान तर्फे 'पैस' खांबाचा अभिषेक व पूजन होईल. मंदिर बंद असल्याने कोणत्याही भाविकांनी
दर्शनासाठी येऊ नये. घरीच राहून माऊलीचे नामस्मरण करा.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा म्हणाले, यात्रोत्सव निमित्त येथे होणारी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता बुधवारी रात्री आठ ते शुक्रवारी (ता. १७) सकाळी आठवाजेपर्यंत नेवासे शहर व शहरातील मुख्य रस्ते बंद राहतील. तसेच तालाठ्यांमार्फत तालुक्यातील सर्व गावांत याबाबत निरोप दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे.
संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com