प्रवासी असल्याचा बहाणा करून लुटणारी टोळी पकडली

The robber gang was caught under the pretext of being a traveler
The robber gang was caught under the pretext of being a traveler

नगर ः प्रवासी असल्याचा बनाव करून खासगी वाहन चालकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. नगर शहरातील वाहन चालकाला लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना अवघ्या 24 तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. 
दत्तात्रय खंडू हापसे (वय 32, रा. टाकळी मियॉं, ता. राहुरी) हे सोमवारी (ता.22) नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकाजवळून मारुती सियाज (एमएच 40बीएफ 7171) वाहनातून राहुरीकडे जात होते. त्यावेळेस प्रवासी म्हणून पाच जण त्यांच्या वाहनामध्ये बसले. त्यांचे वाहन रात्री पावणे बाराच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर नांदगाव फाटा येथे आले. त्यावेळेस एका प्रवाशाने उलटी आल्याचा बनाव करून वाहन थांबविण्यास भाग पाडले. त्यावेळेस डोळ्यात मिरचीची पूड टाकून तसेच धारदार वस्तू पाठीला लावून बळजबरीने नगर-पुणे महामार्गाने सुपा (ता.पारनेर) येथे घेऊन गेले. त्या ठिकाणी बळजबरीने ए. टी. एम. हिसकावून घेतले तसेच धमकी देऊन पासवर्ड घेतला. त्याआधारे ए.टी.एम. कार्डद्वारे पैसे काढले. वाहनासह सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज लुटला. 

दत्तात्रय हापसे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा करणारे आरोपी हे चाकण (जि. पुणे) येथे दरोड्यातील वाहनाची विल्हेवाट लावण्यासाठी आले आहेत, अशी माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने चाकणला जाऊन आरोपी बाबासाहेब उर्फ बाबू बाळू शिंदे (वय 20) व रमेश कचरू आघाव (वय 20, दोघे रा. दहिवंडे, ता. शिरूर कासार, जि.बीड), विश्‍वजित सिद्धेश्‍वर पवार (वय 20, रा. गोमलवाडा, ता. शिरूर कासार) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे दोन साथीदार दहिवंडे येथे गेल्याचे समजले. त्यानुसार एका पथकाने तेथे जाऊन योगेश संजय आघाव (वय 19) याला अटक केली. आणखी एका साथीदार हा फरार झाला आहे.

कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक विवेक पवार, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रवींद्र टकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com