चापडगाव शिवारात लूट, दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

नगर-सोलापूर रस्त्यावर पाटेगाव शिवारात एक जुलै रोजी मध्यरात्री दुचाकी आडवी लावून मालट्रक अडवून एकास शस्त्राचा धाक 45 हजारांना लुटले होते.

नगर : नगर-सोलापूर रस्त्यावर कर्जत तालुक्‍यात रस्तालूट करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली.

शाहूराज बाबासाहेब कोकरे (वय 20, रा. घाट पिंपरी, ता. आष्टी, जि. बीड) व गणेश बाळासाहेब महारनवर (रा. दिघी, ता. कर्जत) अशी त्यांची नावे आहेत. योगेश देवराव गोयेकर (रा. गोयेकरवाडा, ता. कर्जत) व नाथा शिरगिरे (रा. जामखेड) यांचा शोध सुरू आहे. 

हेही वाचा - भेंडा येथे दोन लाखांची लूट, बनावाची शक्यता

नगर-सोलापूर रस्त्यावर पाटेगाव शिवारात एक जुलै रोजी मध्यरात्री दुचाकी आडवी लावून मालट्रक अडवून एकास शस्त्राचा धाक 45 हजारांना लुटले होते. याबाबत सुदर्शन विष्णू बडे (रा. लोणी, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना हा गुन्हा शाहूराज कोकरे व त्याच्या साथीदारांनी केल्याचे समजले. त्यानुसार, पथकाने दिघी येथे सापळा रचून कोकरे याला ताब्यात घेतले.

क्लिक करा - मृताने बाधवले घरातील चौघे

चौकशीत वरील आरोपींची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी गणेश महारनवर याला पकडले. अन्य दोघे पसार आहेत. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिदनकरवाडी (चाकण, पुणे) येथून चोरल्याची त्यांनी सांगितले. तसेच, 10 जून रोजी पाटेगाव शिवारात कर्जत येथे सॅनिटायझर घेऊन जाणारा ट्रकही लुटल्याची कबुली दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery in Chapadgaon area, two arrested