लेबर पुरवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर महिलेला मारहाण करुन दोन लाखाचा ऐवज लंपास

मार्तंड बुचुडे
Sunday, 4 October 2020

धोत्रे (ता. पारनेर) येथील हॉटेल अभिषेक जवळ पाण्याच्या टाकी जवळ आठ ते दहा जणांनी मानेगाव (ता. सिन्नर) येथील चंद्रकला गोपाल गवळी (वय 40) लेबर कॉन्ट्रॅक्टर यांना मारहाण करून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख तीन हजाराचा ऐवज लुटून नेला. या बाबतची फिर्याद गवळी यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली आहे.

पारनेर (अहमदनगर) : धोत्रे (ता. पारनेर) येथील हॉटेल अभिषेक जवळ पाण्याच्या टाकी जवळ आठ ते दहा जणांनी मानेगाव (ता. सिन्नर) येथील चंद्रकला गोपाल गवळी (वय 40) लेबर कॉन्ट्रॅक्टर यांना मारहाण करून सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख तीन हजाराचा ऐवज लुटून नेला. या बाबतची फिर्याद गवळी यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली आहे. यातील संशयीत म्हणून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

गवळी या लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्या मजूर पुरविण्याचे काम करत होत्या. त्यांनी संशयित आरोपी नामदेव उर्फ नामा व त्याचा मामा पंढरी उर्फ पंड्या यांना मजूर देण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्या धोत्रे येथे आल्या होत्या. मात्र त्या वेळी त्यांनी व त्यांचे सात ते आठ साथीदार यांनी धोत्रे येथे अभिषेक हॉटेल जवळ पाण्याच्या टाकी नजिक कच्या रस्त्यावर आल्यावर आरोपींनी गवळी यांच्या जवळील दागिणे चाकूचा धाक दाखवत बळजबरीने हिस्कावून घेतले. त्यास गवळी यांचा भाऊ अक्षय व बहिणीचा मुलगा दिपक यांनी प्रतिकार केला असता त्यांना लाथा बुक्यांनी व काठीने मारहाण केली. यावेळी गवळी यांच्या जवळील सोन्याचे दागिणे तसेच रोख रक्कम अशा एकूण दोन लाख तीन हाजार रूपये किंमतीचा माल चोरून ते पळून गेले.

या बाबत गवळी यांनी पारनेर पोलिस ठाण्यात वरील संशयित आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली. या बाबत पारनेर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिस उपअधिक्षक अजित पाटील तसेच सहाय्क पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळाला भेट दिली. यातील संशयीत आठ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून प्रमुख दोन आरोपी मात्र फरार झाले आहेत. या आठ जणांना पारनेर पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटतक करण्येचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

या बाबत मात्र परीसरात वेगळीच चर्चा सुरू आहे. हा खरा दरोडा नसून हा कमी किंमतीत सोने देतो यातून हा प्रकरा घडला आहे. मात्र संबधीतांनी आपली फसवणुक झाल्याचे समजल्यावर लुटल्याचा बहाणा करत गुन्हा दाखल केला आहे अशी चर्चा अता या परीसरात सुरू आहे. हा स्वस्तात सोने घेण्याच्या नादात झालेली फसवणुक आहे, अशी जोरदार परीसरात चर्चा आहे.
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery near Hotel Abhishek at Dhotre in Parner taluka