
पाथर्डी : मोहटे गावात सुरू असलेल्या सप्ताहादरम्यान सोमवारी (ता. ७) रात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील तीन घरे फोडून रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी मोहटे येथील शेतकरी भाऊसाहेब विठोबा दहिफळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.