esakal | युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुन्हा धावले रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar again rushed to the aid of UPSC students

युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी अनेक मुलांना महाराष्ट्रात सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक मुले दिल्लीला जातात.

युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुन्हा धावले रोहित पवार

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी प्रश्‍न मांडणारे राष्ट्रवादीचे नेते कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात युपीएससीचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची अग्रही मागणी केली आहे.

युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी अनेक मुलांना महाराष्ट्रात सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक मुले दिल्लीला जातात. त्यांना येथेच सुविधा मिळाव्यात म्हणून राज्यात सरकारकडून प्रशिक्षण केंद्र सुरु करावे याबाबत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे, अशी माहिती कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत दिली आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊन अधिकारी व्हावे, अशी इच्छा अनेक तरुणांची असते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसह केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेजण दिल्लीला जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांची इच्छा असताना सुद्धा आर्थिक परस्थितीमुळे दिल्लीला जाऊ शकत नाहीत. त्यांना महाराष्ट्रातच सुविधा मिळणे आवश्‍यक आहे. 

UPSC चा अभ्यास करणाऱ्या मराठी मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी व केंद्रीय पातळीवरील नोकऱ्यांची संधी त्यांनाही मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात State Institute for Administratives Careers या केंद्रांना ताकद दिली तर या मुलांना अभ्यासासाठी दिल्लीला जाण्याचा खर्चही वाचणार आहे.

या मुलांना अभ्यासासाठी राज्यातच सुविधा निर्माण करण्यासाठी व केंद्र स्तरावरील नोकरीच्या संधी राज्यातील युवांना मिळाव्यात यासाठी सरकारमार्फत राज्यातच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत घेतलेल्या बैठकीला उपस्थित होतो, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.