अहिल्याबाई होळकरांचं कार्य रोहित पवार पुढे नेत आहेत - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-Rohit-Pawar
अहिल्याबाई होळकरांचं कार्य रोहित पवार पुढे घेऊ जात आहेत - शरद पवार

अहिल्याबाई होळकरांचं कार्य रोहित पवार पुढे नेत आहेत - शरद पवार

अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात जसं काम केलं तेच काम आमदार रोहित पवार पुढे घेऊन जात आहेत, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं आहे. चौंडी या अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडेही उपस्थित होते. आज अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थळ आहे. (Rohit Pawar is going to carry forward the work of Ahilyabai Holkar says Sharad Pawar)

हेही वाचा: वाद हनुमान जन्मस्थळाचा; पण साधूचं भिडले, नाशकात 'खुर्ची'वरून वादंग

पवार म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचं काम हे सर्वसमावेशक होतं. पर्यटनाला प्रोत्साहन देणारं होतं. राज्यावर संकट आलं तरी उभं राहिलं पाहिजे आणि राज्यकारभार केला पाहिजे आणि ते करत असताना शेवटच्या व्यक्तीसाठी काही करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे सूत्र आपल्या नजरेपुढं ठेवलं. अहिल्यादेवींच्या आजचा जयंतीचा कार्यक्रम हा स्त्री वर्गाचा सन्मान करणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांचा अधिकार वाढवणं अतिशय महत्वाचं आहे.

हेही वाचा: बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, पडळकरांना रोखलं

इथला कर्जत-जामखेडचा भाग हा महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे इथलं हे दुखणं जुनं आहे. एकेकाळी शेजारच्या अकोल्याला पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः आल्या होत्या. त्यांनी इथली स्वतः पहाणी केली. तरीही इतक्या वर्षात इथला पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. पण आनंद एका गोष्टी आहे की, कालच्या निवडणुकीत तुम्ही रोहित पवारांसारख्या तरुण कार्यकर्त्याला निवडून दिलं आणि त्याला संधी दिली. या दोन अडीच वर्षात अनेक काम त्यांची अशी दिसतात ज्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पष्ट विचार दिसतोय.

अहिल्यादेवींचे कार्य रोहित पवारांनी पुढं नेलं - पवार

उदाहरणार्थ अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठिकठिकाणी बारवं केली त्यातून पाण्याची सुविधा केली. कर्जत-जामखेडमधील लोकांशी चर्चा केल्यानंतर इथल्या पाण्याचा प्रश्न समोर येतो. रोहित पवार यावर काम करत आहेत.

अहिल्याबाईंचं दुसरं वैशिष्ट म्हणजे त्यांनी आपल्या राज्यात लोकांना काम दिलं. विणकरांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून माहेश्वरी कपडा, माहेश्वरी साडी संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली याची सुरुवात अहिल्यादेवींनी केली. आज अहिल्यादेवींचं स्मरण करताना रोहित पवारांनी इथं एमआयडीसी कशी होईल यासाठी बैठका घेतल्या.

तिसरी गोष्ट महत्वाची अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात दळणवळणाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. अनेक ठिकाणी त्यांनी रस्ते केले. रोहितनं जबाबदारी घेतल्यानंतर दोन महामार्ग मंजूर झाले. त्यामुळं रस्ते, पाणी, रोजगार आहे जे अहिल्यादेवींनी चालू ठेवलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचा आमदार काम करतोय. याला मनापासून आनंद होतोय. मला सर्वांना एकच विनंती आहे की, ही विकासाची गंगा या भागात येईल या कामात तुमचं सर्वांच सहकार्य सर्वांना मिळेल.

Web Title: Rohit Pawar Is Going To Carry Forward The Work Of Ahilyabai Holkar Says Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top