esakal | आमदार रोहित पवार यांनी दिला बालपणाच्या आठवणीला उजाळा
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar told about the progress journey of Salunwala

कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या खासगी आयुष्याविषयी एक ट्विट केलं आहे. आमदार रोहित पवार हे नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असतात.

आमदार रोहित पवार यांनी दिला बालपणाच्या आठवणीला उजाळा

sakal_logo
By
अशोक मुरूमकर

नगर : राजकारणाचा कितीही तिटकारा असला तरी या क्षेत्रातील लोकांविषयी सर्वसामान्यांना आकर्षण असतं. त्यातल्या त्यात खासगी आयुष्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. ते नेमकं काय खातात, कोणत्या गाड्या वापरतात, त्यांच्या आवडी-निवडी काय असतात. याबाबत उत्सुकता असते.

महाराष्ट्रात पवार कुटुंबाविषयी कोणाला जाणून घ्यायला आवडणार नाही? त्यामुळे या घराण्यातील कोणाही व्यक्तीने ट्विट अथवा काही फेसबुक पोस्ट केली तर ती तुफान व्हायरल होते.

कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या खासगी आयुष्याविषयी एक ट्विट केलं आहे. आमदार रोहित पवार हे नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असतात.

राज्यातील घडामोडींसह ते राष्ट्रीय पातळीवरील घटनांबाबतही व्यक्त होत असतात. अतिशय सवेदनशीलपणे नागरिकांचे प्रश्‍न मांडून सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. बेरोजगारी, स्पर्धा परिक्षा असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्‍न नेहमी त्याबद्दले ते भावना व्यक्त करतात. सामाजिक क्षेत्रातही नेहमी ते ॲक्टीव असतात. राजकारणात असले तरी ते होम पिचवर तेवढच संवेदनशील असतात. 

आमदारकीची शपथ घेतानाही त्यांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला होता. वडील राजेंद्र आणि आई सुनंदा यांच्याविषयीही ते लिहित असतात. पत्नी कुंती, मुलगा शिवांश किंवा मुलीच्या खेळण्याच्या हट्टाबाबतही ते व्यक्त होतात. 

असंच एक ट्विट करत त्यांनी संवेदना दाखवली आहे. या ट्विटच्या माध्यमातून जुन्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत आठवणीला उजाळा देताना म्हटलं आहे की, ‘लहानपणी ज्यांनी माझे केस कापले ते हेमंत जाधव काल माझा मुलगा शिवांशचे केस कापण्यासाठी आले असता त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या व्यवसायाचाही विस्तार केला असून आज पुणे जिल्ह्यात त्यांची सहा सलून सेंटर आहेत. त्यांची ही प्रगती अभिमानास्पद आहे.’

संपादन - अशोक निंबाळकर