रोहित पवारही घालायचे विमान टायरच्या चपला! राशीनमध्ये आठवणींना उजाळा

Rohit Pawar used to wear simple slippers as a child
Rohit Pawar used to wear simple slippers as a child

राशीन : अरे व्वा.....तुम्ही तर ब्रॅण्डेड चपलेला लाजवेल अशा चप्पला तयार करीत आहात, अशी चप्पल तर मी लहानपणी घातली होती, असे म्हणत तयार झालेली विमान टायरची चप्पल हातात उचलून घेत आमदार रोहित पवार यांनी चप्पल तयार करणाऱ्या राशीनमधील कारागीराची विचारपूस केली. हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात करून उद्योजक व्हा, असे आवाहन केले.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील राशीन येथील संत रोहिदासनगरमध्ये आमदार रोहित पवार आले असताना आपल्या घराच्या अंगणातच चप्पल तयार करीत बसलेले शिवाजी कांबळे त्यांना दिसले. त्यांना पाहून आमदार रोहित पवार थेट कांबळे यांच्याकडे गेले. त्यांनी तयार केलेली चप्पल हातात घेऊन पाहत त्यांच्या व्यवसायाबाबत माहिती घेतली.

या चपला टिकाऊ आणि दर्जेदार आहेत. मात्र आजच्या फॅशनच्या जमान्यात त्यांना मागणी किती आहे, हा व्यवसाय व्यापक प्रमाणात करा, केंद्र-राज्य सरकारच्या विविध योजना आहेत, त्या योजनेचा लाभ घेऊन उत्पादन वाढवा. बॅंकांकडे जाऊन व्यवसायासाठी कर्ज घ्या, आजच्या जमान्यात चालेल असे नवीन उत्पादन तयार करा, त्याचे ब्रॅंडिंग करा, यासाठी काही अडचण आल्यास मला भेटा, मी आहेच. असा शब्द आमदार पवार यांनी कांबळे यांना दिला. 

या वेळी आमदार पवार यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर सायकर, शिवसेनेचे शहरप्रमुख मालोजी भिताडे, दादासाहेब परदेशी, रामकिसन साळवे आदी पदाधिकारी होते.

पवारांचा नातू दारी आल्याने ते भारावले

दरम्यान शरद पवारांचा नातू आपल्या दारी येऊन आपण बनविलेल्या चप्पलेचे कौतुक करतो, आपली विचारपूस करतो या घटनेने शिवाजी कांबळे भारावून गेले होते. एकूणच आमदार रोहित पवारांनी त्यांच्याशी साधलेला सवांद त्यांना चांगलाच भावला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com