Wushu Competition: 'आंतरराष्ट्रीय वुशु स्पर्धेत रोहित थोरातला ब्राँझपदक'; वडिलांनी मेहनत घेऊन दिलं आर्थिक पाठबळ
रोहितने यापूर्वी राज्यस्तरीय वुशु स्पर्धेमध्ये एक सवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळविले आहे. आंतरमहाविद्यालयीन वुशु स्पर्धेमध्ये चार सुवर्णपदक, चार वेळा राष्ट्रीय वुशु स्पर्धेमध्ये सहभाग व एक वेळा ऑल इंडिया वुशु स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.
Rohit Thorat celebrates his bronze medal win in international Wushu, credits father’s supportSakal
जामखेड : मॉस्को (रशिया) येथे आयोजित मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशु अजिंक्यपद स्पर्धेत जामखेडच्या आयडियल स्पोर्ट अकॅडमीचा खेळाडू रोहित थोरात याने भारताचे प्रतिनिधित्व करत ब्राँझपदक मिळवले आहे.