रोहमारे साहित्य पुरस्कार जाहीर, ७ डिसेंबरला होणार वितरण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

प्रत्येकी 11 हजार रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टकडे आलेल्या 48 साहित्यांतून वरील ग्रंथांची पुरस्कारांसाठी निवड झाली.

कोपरगाव : येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे, कार्यवाह डॉ. जिजाभाऊ मोरे यांनी केली. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. श्रीकांत बेडेकर यांच्या हस्ते 7 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुरस्कार वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुभाष महाजन राहणार आहेत. 

रोहमारे ट्रस्टतर्फे 1989पासून ग्रामीण कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाचे पुरस्कारार्थी असे : संदीप शिवाजी जगदाळे (कविता- असो आता चाड), प्रवीण दशरथ बांदेकर (कादंबरी- इंडियन ऍनिमल फार्म), डॉ. प्रभाकर शेळके (कथासंग्रह- व्यवस्थेचा बदल), बाळू दुगडूमवार (समीक्षा- बाबा आमटे व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व). 

प्रत्येकी 11 हजार रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ट्रस्टकडे आलेल्या 48 साहित्यांतून वरील ग्रंथांची पुरस्कारांसाठी निवड झाली. डॉ. भाऊसाहेब गमे, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. गणेश देशुमख, प्रा. विजय ठाणगे यांनी परीक्षण केले.

तसेच वीरभद्र मिरेवाड (माती शाबूत राहावी म्हणून), बाबाराव विश्वकर्मा (गावमातीचे अभंग), गजेंद्र कपाटे (उष्ठावळ), एकनाथ तट्टे (येजो), अनंता सूर (वाताहत), स्त्री जाणीव आणि स्त्रीसंवेदन: एक अभ्यास (रचना) यांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड झाली. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohmare Literature Award announced