esakal | तुम्ही बांबूचा टूथब्रश कधी वापरलाय, कर्जत सीटी रोटरी करतेय वाटप

बोलून बातमी शोधा

The Rotary Club of Karjat City has undertaken an eco-friendly toothbrush initiative to protect the environment

कर्जत शहरात सुरू असलेले स्वच्छ‌‌‌ सर्व्हेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान या उपक्रमाला पूरक असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तुम्ही बांबूचा टूथब्रश कधी वापरलाय, कर्जत सीटी रोटरी करतेय वाटप
sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी इकोफ्रेंडली टुथब्रश उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष विशाल म्हेत्रे यांनी दिली आहे.

कर्जत शहरात सुरू असलेले स्वच्छ‌‌‌ सर्व्हेक्षण 2021 व माझी वसुंधरा अभियान या उपक्रमाला पूरक असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या घरात असलेले जुने टुथब्रश कचरा म्हणून फेकून न देता ते रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या सदस्यांना संपर्क करून त्यांच्याकडे द्यावेत व त्याच्या बदल्यात नविन इकोफ्रेंडली बांबुपासून बनवलेले टुथब्रश घेऊन जावेत.

दरवर्षी प्लास्टिकपासून बनलेले लाखो टुथब्रश नदीमध्ये किंवा गटारीमध्ये अडकून बसतात व ते कित्येक वर्षे तिथेच पडून रहातात.परिणामी त्याचा पर्यावरणाला धोका होतो. कित्येक वेळा हे टुथब्रश जनावरांच्या पोटात जातात. ते जीवितास हानिकारक होतात. म्हणून हे प्लास्टिकपासून बनलेले टुथब्रश इतरत्र कुठेही फेकुन न देता ते रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वितरण केंद्रावर आणून द्यावेत व नवीन इकोफ्रेंडली बांबूपासून बनवलेला टुथब्रश घेऊन जावा.

जुना प्लास्टिकचा टुथब्रश योग्य किंमतीत घेतला जाईल तर नवीन इकोफ्रेंडली बांबूपासून बनवलेला टुथब्रश ना नफा ना तोटा या तत्वावर माफक दरात मिळेल. या उपक्रम यशस्वी करण्यासाठी साठी प्रोजेक्ट प्रमुख गजानन चावरे, राहुल खराडे, ओंकार तोटे व सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत.

या ठिकाणी इको फ्रेंडली टूथब्रश मिळतील

परिवार एजन्सी, धन्वंतरी मेडिकल, अनुष्का मेडिकल, अक्षय मेडिकल, स्मिता मेडिकल, समर्थ किराणा स्टोअर्स, श्रीराम मेडिकल, संकेत इलेक्ट्रिकल, विवेकानंद पुस्तकालय येथे इकोफ्रेंडली टुथब्रश मिळतील.

शहर स्वच्छते बरोबरच पर्यावरण रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. प्लास्टिक मुक्त कर्जत शहर व तालुका ही संकल्पना आता लोकचळवळ होत चालली आहे. त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ कर्जत सीटीने सुद्धा नियमितपणे खारीचा वाटा उचलला आहे. नेहमीप्रमाणे याही उपक्रमास कर्जतकरानी सहकार्य करावे. 
- डॉ. संदीप काळदाते, शाखा संस्थापक, कर्जत