कोरोनायोद्धांसाठी उचलले हे पाऊल... 

rotary club
rotary club
Updated on

कर्जत (नगर): कोरोनाच्या या संकटकाळात रोटरी क्लब या सामाजिक संघटनेने प्रशासनाला व समाजाला केलेली मदत अनमोल असून याचा आदर्श घेत सेवाभावी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.

सध्या कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेताना डॉक्टर व इतर कर्मचारी वर्गांसाठी आवश्यक असणारे पीपीई किट तसेच N95 मास्क यांची वाढती गरज लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने शंभर पीपीई किट व तेव्हडच  N95 मास्क असे सुमारे एक लाख रुपये किंमतीचे साहित्य प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी ही मदत स्विकारली.

यावेळी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काळदाते, अध्यक्ष प्रा विशाल मेहेत्रे, सचिव घनश्याम नाळे, नितिन देशमुख, खजिनदार राजेंद्र जगताप, नितीन तोरडमल, चंद्रकांत राऊत, ओंकार तोटे, संदीप गदादे, अक्षय राऊत, श्रीराम गायकवाड, रवींद्र राऊत, सचिन धांडे, सचिन गोरे, अविनाश पुराणे उपस्थित होते. त्या म्हणाल्या गेल्या चार वर्षांपासून अनेक विधायक कामात रोटरी अग्रेसर आहे. त्याची प्रचिती वारंवार येते. या रोटरी परिवारातील प्रत्येक सदस्य योगदान देत असून ते इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
नानासाहेब आगळे म्हणाले, कोरोना हे जागतिक संकट असून त्याची व्याप्ती दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. रोटरीची ही मदत सर्वोत्तम आहे.

डॉ. संदीप काळदाते म्हणाले, रुग्णसेवा हीच ईशसेवा मानून शेवटच्या श्वासापर्यंत आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्या दिवंगत डॉ. विलास काकडे यांना हीच खरी आदरांजली ठरेल. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने मागील चार वर्षापासून समाजोपयोगी कामे केली जात आहेत. येथून पुढेही समाजातील विविध विषयांवर काम करण्यासाठी व आवश्यक मदतकार्यात रोटरी क्लब नेहमी पुढेच असेल असे आश्वासन अध्यक्ष प्रा.विशाल मेहेत्रे यांनी दिले. रोटरीच्या मदतीबद्दल तहसीलदार नानासाहेब आगळे, आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी आभार मानले.

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सुमारे लाखभर रुपयांची पीपीई किट व मास्क देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com