esakal | वसमतमध्ये भरदिवसा घर फोडून पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास Nagar
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar

वसमतमध्ये भरदिवसा घर फोडून पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसमत : वसमत शहरातील विष्णू नगर भागात घराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना सोमवारी ता. २७ घडली. दुपारी तीन वाजता झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसमत शहरातील विष्णू नगरात गंगाप्रसाद गोपाळसा नांदगावकर यांचे घर आहे. सोमवारी दुपारी ते बाहेर गेले होते यावर चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेली रोख रक्कम तीस हजार रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज पळविला.

हेही वाचा: "माय 150 रुपये रोजाने शेतात जातीय" परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप

सायंकाळी श्री नांदगावकर हे घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील रोख रक्कम व दागिने गेल्याचे आढळून आले त्यांनी तातडीने वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक बालाजी खार्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दिवसा घरफोडीची घटना घडल्यामुळे आता पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक संपला की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

loading image
go to top