RTI Act 2005 : माहिती अधिकार सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक - हजारे

कायद्याला १८ वर्षे पूर्ण होत असल्याने कार्यकर्त्यांशी संवाद
anna hajare
anna hajare sakal

टाकळी ढोकेश्वर - माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. सरकारी अधिकारी याबाबत वेळकाढू धोरण ठेवत आहेत. सक्षम अधिकारी मार्फत सुनावणी घेण्यात येत नाहीत. अपिलाची प्रलंबित संख्या मोठी आहे. हा कायदा अधिक सक्षम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. माहिती अधिकार कायद्याला १८ वर्ष पूर्ण होत असल्याने विविध भागातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे येऊन अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला.

यावेळी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, फॅबियन सॅमसंन, तानाजी शेरखाने, सुनीता शेरखाने, प्रीती निकाळजे, वैशाली डोंगरे, संजय कोने, अविनाश भाकरे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष केकाण, अकोले माजी सरपंच ज्ञानेश्वर गिरी, आपच्या महिला कार्यकर्त्या सीता केंद्रे, प्रकाश हागवाने, आनंद सानप, वैजनाथ शिरसाठ आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, निःस्वार्थी काम करणारे कार्यकर्ते तयार व्हायला हवेत. राजकारणात निःस्वार्थी लोक जो पर्यंत येत नाहीत, तो पर्यंत चांगले राजकारण निर्माण होणार नाही. चुकीच्या माणसाला राजकारणातून पद, प्रतिष्ठा मिळेल पण ती टिकणार नाही. त्याचा आनंद त्यास मिळणार नाही.

anna hajare
Mumbai News : निलंबित अभियंत्याला राजकीय हस्तक्षेपामुळे इच्छुक पदी बदली; RTI मधून माहिती उघड

हजारे म्हणाले, निःस्वार्थी काम करणारे कार्यकर्ते तयार व्हायला हवेत. राजकारणात निःस्वार्थी लोक जो पर्यंत येत नाहीत, तो पर्यंत चांगले राजकारण निर्माण होणार नाही. चुकीच्या माणसाला राजकारणातून पद, प्रतिष्ठा मिळेल पण ती टिकणार नाही. त्याचा आनंद त्यास मिळणार नाही.

माहिती अधिकार अर्जाचे द्वितीय अपिलाची प्रलंबित संख्या एक लाखाहून अधिक आहे. पूर्ण संख्येने माहिती आयुक्त नाहीत. माहिती अधिकार अर्जाबाबत सरकारी यंत्रणा वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवत आहे. माहिती अधिकार हा १८ वर्षाचा म्हणजे सज्ञान झाला. मात्र एकूणच यंत्रणेमध्ये त्याबाबत अनास्था दिसून येते.

विजय कुंभार, माहिती अधिकार कार्यकर्ते, पुणे

anna hajare
Maratha Reservation : 'आपला दणका लय अवघड असतो, मग सुट्टी नाय...!' भुजबळांच्या येवल्यात जावून जरांगेंचा हल्ला

सेवाभावी वृत्ती जोपासण्यासाठी सहनशीलता असायला हवी. चांगले काम करताना निंदा व अपमान सहन करायला शिकले पाहिजे. समाजातील नेतृत्वाकडे लोक पाहत असतात. राजकीय नेत्याचे आचरण शुद्ध असेल तरच चांगले कार्यकर्ते व चांगला समाज निर्माण होऊ शकेल.

अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com