esakal | Ahmednagar : अत्याचाराचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये चालवावा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

अत्याचाराचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये चालवावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : पोटच्या गोळ्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी. विकृतीचा नायनाट करण्याची आज आवश्यकता आहे, अन्यथा अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे, असा संताप महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला.

संगमनेर शहर पोलिस ठाण्यास गुरुवारी (ता. ३०) रात्री उशिरा भेट देऊन त्यांनी, अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, ‘‘या खटल्याचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस करीत आहे. पीडितेला लवकर न्याय मिळाला तरच अशा विकृत प्रवृत्तीला जरब बसेल. हे कायद्याचे राज्य आहे. पोलिस त्यांचे काम चोख करीत आहेत. बापाला मुलीचे नाते समजत नसेल, तर अशा वाईट प्रवृत्तींचा समाजघटकांनी एकत्र येऊन नाश करण्याची गरज आहे.’’ या वेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नगर जिल्हा सरचिटणीस सचिन मुजगुले उपस्थित होते.

loading image
go to top