ग्रामीण विद्यार्थी अॉनलाईन शिक्षणाच्या रेंजबाहेरच

Rural students are out of the range of online education
Rural students are out of the range of online education
Updated on

नगर तालुका ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. शहरी भागात सर्व सुविधा उपलब्ध असल्याने हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला. मात्र, ग्रामीण भागात आजही नेटवर्क, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यांसह विविध समस्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. 

कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांसह शेतमजूर पालकांचे आर्थिक कंबरडे मोडले. शेतमालाला भाव नाही, सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पाल्यांसाठी मोबाईलचा भुर्दंड बसला. काही एकत्रित कुटुंबांत पाल्यांची संख्या अधिक असल्याने कोणा-कोणाला मोबाईल घ्यायचा, असा प्रश्‍न पालकांना पडला. मोबाईल घेतला, तर त्याच्या रिचार्जचा भुर्दंड बसत आहे. त्यात अनेक गावांत नेटवर्क मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत. 

नेटवर्कसाठी गावकुसाबाहेर 
ग्रामीण विद्यार्थी नेटवर्क मिळावे म्हणून गावाबाहेरील उंच टेकडी, उंच झाडावर किंवा ज्या ठिकाणी नेटवर्क मिळेल, अशा ठिकाणी जाऊन ऑनलाइन वर्गात सहभागी होत आहेत. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ऑनलाइन अभ्यासाचे वेळापत्रक, विषयानुरूप वर्गांचे वेगवेगळे ग्रुपही तयार करण्यात आले. शिक्षकांना विद्यार्थी ऑनलाइन दिसतो. मात्र, त्याच वेळी गावात विनाकारण फिरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे. 

पालक आले जेरीस 
एकाच कुटुंबातील दोन किंवा तीन विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी असल्याने, एकाच वेळी पालकांना प्रत्येक पाल्यास स्मार्ट फोन देणे जिकिरीचे ठरत आहे. एकाच मोबाईलवर अभ्यास करावा, अशी पालकांची अपेक्षा असते. मात्र, ती फोल ठरत आहे. काही पालकांना कामासाठी मोबाईलची गरज भासते. मात्र, पाल्यांच्या ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल त्यांच्या हातात दिल्यावर पालकांची अडचण होते. त्यातूनही अनेकदा खटके उडतात. काहींनी नेटवर्क नसल्याने मोबाईलमध्ये दोन-दोन सिमकार्ड टाकले. त्यात मोबाईल कंपन्यांसह नेटवर्क पुरविणाऱ्या कंपन्यांचा मोठा व्यवसाय होत असला, तरी पालक चांगलेच जेरीस आले आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com