esakal | क्रिकेटच्या देवा, सांग तू काय मदत केलीस

बोलून बातमी शोधा

सचिन तेंडुलकर
क्रिकेटच्या देवा, सांग तू काय मदत केलीस...
sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः क्रिकेट व सचिन तेंडुलकर हे घट्ट नाते आहे. सचिनच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होणारच नाही. अशा या क्रिकेटच्या देवास संगमनेरकराने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व व्हेंटिलेटरसाठी साकडे घातले आहेत आहे.

क्रिकेटने तेंडुलकर यास आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी, पैसा, मान मरातब मिळवून दिले. खासदारकीही मिळाली. कोरोना प्रादुर्भावाने झालेल्या भयावह परिस्थितीत देशाला त्याने काय मदत केली ? असा प्रश्‍न सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्यामुळे संगमनेर येथील सचिनचे चाहते असणारे प्रथमेश बेल्हेकर उद्विग्न झाले.

त्यांनी हक्काने ट्‌विटरवर थेट सचिनलाच "प्रिय देवा सचिन तेंडुलकर... तुझ्यासाठी अगदी आजी-आजोबांपासून, तर आजच्या पिढीपर्यंत ज्या कोणी प्रार्थना केलीय, त्या प्रत्येकाला आज तुझ्या मदतीची गरज आहे. देशात व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची नितांत गरज असल्याने त्याची व्यवस्था तू करून दे ! असे साकडे घालीत टॅग केले आहे.

सध्या आयपीएल जोरात सुरू आहे. सगळीकडे लॉक असताना आयपीएल अनलॉक कशी काय असा सवाल उपस्थित केला आहे. अजिंक्य रहाणेही संगमनेरचाच आहे. त्याच्या मदतीविषयीही विचारणा केली जात आहे. पॅट कमिन्सने कोरोना रूग्णांसाठी ३७ लाख रूपयांची मदत दिली आहे.

कोण कोणत्या देशाचा खेळाडू भारतीयांसाठी मदत देतो. मग आपल्या देशातील लोकांच्या जीवावर मोठे झालेले काय करतात, असा सवाल उद्विग्न सवाल सोशल मीडियातून केला जात आहे.

एक कोटी रूपये दिले

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने कालच ट्विट करून एक कोटी रूपये दिल्याचे जाहीर केले. हे पैसे अॉक्सीजनसाठी दिले आहेत. अडीचशे व्यापारी मिशन अॉक्सीजनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यात मीही सहभाग घेतल्याचे सचिनने ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोरोनाची ही दुसरी लाठ भयंकर आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही तो ट्विटमध्ये म्हणतो.