
शिर्डी : तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर साईबाबांच्या पादुका आज पहिल्यांदाच तीन राज्यांतील भाविकांच्या दर्शनासाठी येथून रवाना झाल्या. साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, ज्या भाविकांना साईसमाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत येणे शक्य होत नाही, त्यांना दर्शनाची संधी मिळावी, हे दोन प्रमुख हेतू डोळ्यांसमोर ठेवून साई संस्थानचा कारभार पहाणा-या त्रिसदस्यीय समितीने पादुका, विविध ठिकाणच्या दर्शन सोहळ्यासाठी धाडण्याचा निर्णय घेतला.