esakal | साई संस्थांनची झोळी झाली रिकामी, खर्चाची तोंडमिळवणीही झाली अवघड
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Sansthan in financial difficulties

कामगार संघटना एकत्र येऊन ग्रॅज्युएटीमधील बदल, पेन्शन योजनेतील त्रुटी दूर करणे, 595 कंत्राटी कामगारांना संस्थान आस्थापनेवर घेऊन कायम कामगारांच्या सवलती देणे, अशा मागण्या करीत आहेत. उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले असताना, कामगार संघटनांच्या मागण्या मार्गी लावायच्या आहेत. उद्यापासून त्यांचे घंटानाद आंदोलन सुरू होत आहे.

साई संस्थांनची झोळी झाली रिकामी, खर्चाची तोंडमिळवणीही झाली अवघड

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः साईबाबांचे मंदिर बंद आणि दानपेट्या रिकाम्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांत तब्बल 183 कोटींच्या उत्पन्नाला साईसंस्थानला मुकावे लागले. सहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाताला द्यायला काम नाही. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना दरमहा 12 कोटी रुपये पगार द्यावा लागत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांनी सांगितले. 

साईसंस्थानासमोरील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी काय ठरवले आहे, याबाबत मात्र त्यांनी माहिती दिली नाही. राज्य सरकारने मंदिर सुरू करण्यास परवानगी दिली, तर कोविडसोबत कसा मुकाबला करणार, कोविड रुग्णालय वेळेत का सुरू होत नाही, उत्पन्न बंद असल्याने खर्चाची तोंडमिळवणी कशी केली जाईल, अशा एक ना अनेक समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे आव्हान आहे. त्यासाठी बगाटे यांनी काही योजना तयार केलीही असेल, मात्र आज तरी त्यांनी ती जाहीर केली नाही. कामगारांच्या हाताला द्यायला काम नाही. त्यांना पूर्ण पगार द्यावा लागत असल्याचे वास्तव त्यांनी पत्रकात मांडले आहे. 

त्याच वेळी 173 कंत्राटी कामगार कोविड रुग्णालयात जोखमीची कामे करतात. त्यांची 40 टक्के वेतनवाढ मागे घेण्यात आली. त्यांनाही पुरेसे वेतन देता येईल का, यासाठी त्यांना पुढाकार घ्यावा लागेल. अधिकार मर्यादित असताना, या अडचणी सोडविण्याचे कौशल्य त्यांना दाखवावे लागेल. पूर्वीच्या दोन्ही अधिकाऱ्यांना तसे कौशल्य दाखविता आले नाही. सध्या साईसंस्थान आर्थिक संकटात सापडले आहे. 

हेही वाचा - कर्जतचा महसूल विभाग धावला आरोग्याच्या मदतीला

कामगार संघटना एकत्र येऊन ग्रॅज्युएटीमधील बदल, पेन्शन योजनेतील त्रुटी दूर करणे, 595 कंत्राटी कामगारांना संस्थान आस्थापनेवर घेऊन कायम कामगारांच्या सवलती देणे, अशा मागण्या करीत आहेत. उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले असताना, कामगार संघटनांच्या मागण्या मार्गी लावायच्या आहेत. उद्यापासून त्यांचे घंटानाद आंदोलन सुरू होत आहे. राज्य सरकारने मंदिर सुरू करण्यास परवानगी दिली, तर कोविड रोखण्यासाठी काय ऍक्‍शन प्लॅन तयार केला, याची माहिती कामगारांनाही नाही. 

बैठकांत वेळ दवडला 
साईसंस्थानाचे 50 बेडचे कोविड रुग्णालय वेळेत सुरू व्हायला हवे होते. दुर्दैवाने त्यातील अडचणी अद्यापही सुटू शकलेल्या नाहीत. हे रुग्णालय सुरू झाले असते, तर किमान शिर्डी परिसरातील गावांत कोविड नियंत्रणाची रंगीत तालीम झाली असती. त्यातून एखादे मॉडेल पुढे आले असते. नियमीत बैठका आणि विचार विनीमय, यात अधिकाऱ्यांचा सहा महिन्याचा काळ गेला. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image