साई संस्थानचे अधिकारी चिडले, इतिहासातील बदनाम पात्रासोबत माझी तुलना केल्यानेच...

Sai Sansthan officials say, "I was upset to be compared to a notorious character."
Sai Sansthan officials say, "I was upset to be compared to a notorious character."
Updated on

शिर्डी ः ः ""माझी भूमिका हटवादीपणाची नाही. ग्रामस्थांच्या सुलभ साईदर्शनासाठी आपण तयार केलेल्या मसुद्यावर ग्रामस्थांच्या हरकती मागविल्या जातील. ग्रामस्थांच्या योग्य सूचनांच्या आधारे त्यात बदल केले जातील. हा मसुदा प्रसिद्ध करण्यापूर्वी उच्च न्यायालयासमोर ठेवला आहे. त्यावर तदर्थ समितीत एकमत न झाल्याने तसे करावे लागले. या बाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये,'' अशी भूमिका आज साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी चित्रफितीद्वारे ग्रामस्थांसमोर मांडली. 

ही चित्रफीत शहरातील प्रमुख ग्रामस्थांना सोशल मीडियाद्वारे पाठविण्यात आली आहे. तीत बगाटे यांनी म्हटले आहे, की गेल्या दोन- सव्वादोन महिन्यांत बारा लाख भाविकांनी साईदर्शन घेतले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा त्यांत समावेश होता. या सर्वांनी दर्शनव्यवस्था उत्तम असल्याचा अभिप्राय दिला.

पूर्वी भाविक एका मिनिटात दर्शन करून मंदिराबाहेर पडायचा. आता तो पाच ते सात मिनिटे मंदिरात असतो. त्यामुळे समाधानी होतो. सध्याची दर्शनव्यवस्था सर्वोत्तम आहे. ग्रामस्थांसाठी स्वतंत्र दर्शनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यावरून वाद होण्याचे कारण नाही, कारण मी सदैव चर्चेला तयार आहे.

ग्रामस्थांना सोबत घेऊन या व्यवस्थेची आखणी केली जाईल. या मुद्द्यावर कोणीही वाद उपस्थित करू नये. ज्यांना शंका आहे, त्यांच्यासोबत चर्चेची तयारी आहे. 

माध्यम प्रतिनिधींसोबतदेखील आपली चर्चेची तयारी आहे. मात्र, एका वृत्तवाहिनीने वादग्रस्त विशेषण देऊन आपला उल्लेख केला. त्यामुळे आपण कमालीचे व्यथित झालो. ज्याचे विशेषण लावून माझा उल्लेख झाला, ते पात्र इतिहासातील कमालीचे बदनाम पात्र आहे. असे व्हायला नको होते. मला याबाबत आप्तेष्टांचे फोन आले. त्यांनाही खूप वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया बगाटे यांनी दिली आहे. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crores Spent, Yet No Clean Drinking Water: Ahilyanagar MPs Target Administration
Dr. Sujay Vikhe Patil Assures Faster Completion of Ahmednagar–Savali Vihir Highway Project
Enrollment Crisis Hits Ahmednagar: 75 Zilla Parishad Schools Locked in Nine Years
MP Nilesh Lanke Orders Quality Road Construction as Per Sanctioned DPR
Marathi News Esakal
www.esakal.com