Shirdi: साईबाबांची झोळी सोन्याने भरली, ठेवायला नाही जागा, संपत्तीत मोठी वाढ..

सुमारे अडीचशे किलो वजनाचे सोने वितळवण्या योग्य आहे. त्यातील सुमारे १४० किलो वजनाच्या वस्तू वितळवून त्याची सुवर्ण नाणी तयार करावीत, असा निर्णय साई संस्थानने काही वर्षांपूर्वी घेतला. त्यास उच्च न्यायालयाने मान्यता दिली.
Overflowing gold donations at Shirdi’s Saibaba temple highlight increasing faith and rising wealth.
Overflowing gold donations at Shirdi’s Saibaba temple highlight increasing faith and rising wealth.Sakal
Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी : साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे पाचशे किलो सोने साचले आहे. त्यात दागिने स्वरूपातील सोने अधिक आहे. अलीकडच्या काही वर्षांत सोन्याच्या भावात दुपटीने वाढ झाल्याने या सोन्याने साई संस्थानच्या संपत्तीत तब्बल अडीचशे कोटी रुपयांची वाढ झाली. हे खरे असले, तरी देणगी स्वरूपात येणारे हे सोने साठवायला सध्या जागा कमी पडते आहे. स्टेट बॅंकेकडे हे सोने ठेवायला दिले, तर त्यावर अडीच टक्के व्याज मिळू शकते. मात्र, ही बाब न्यायप्रविष्ट झाल्याने त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ही परिस्थिती अशीच कायम राहिली, तर देणगी स्वरूपात येणारे सोने साठविण्यासाठी विस्तारित जागा तयार करण्याची वेळ साई संस्थानवर येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com