
अकोले : मुलाच्या निधनाची बातमी कळाली दुःख झाले; मात्र माझा संदीप देशाच्या कामी आला हे आमच्या कुटुंबाचे भाग्य आहे. वडील पांडुरंग गायकर यांनी डोळ्याच्या कडा पुसत आपली भावना व्यक्त केली. पत्नी रूपाली गायकर यांनीही आपले दुःख व्यक्त करताना मला कुटुंबाला आधार द्यावाच लागेल, माझे पती माझी व कुटुंबाची खूप काळजी घ्यायचे, मला क्लासला जाताना हळू जा, असा सूचना करायचे, आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली असून, मी माझ्या पतीला गमावले, तरी ते देशहिताच्या कमी आले, याचा मला सार्थ अभिमान आहे. सैन्यदलात जाण्याबद्दल विचारले असता माझा निर्णय माझ्या कुटुंबातील सर्वजण घेतील, असे रूपाली गायकर म्हणाल्या.