समृद्धी महामार्गाने घेतला दोन मुलींचा बळी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

धनश्री मंगेश पालवे (वय 5 रा जेऊर कुंभारी) व प्रगती नितीन आव्हाड( वय 9 रा कोपरगाव बेट)अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत.

कोपरगाव : तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाने दोन अल्पवयीन मुलींचा जीव घेतला. काम करताना केलेल्या हलगर्जीपणाचे हे बळी आहेत.

दरम्यान ग्रामस्थांच्यावतीने कंपनीला जाब विचारण्यासाठी आज दुपारी अडीच वाजता कंपनीच्या कार्यालयात  मोर्चाने येणार असल्याची माहिती समजते. लवकरात लवकर याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून ठेकेदाराने खबरदारी घ्यावी अन्यथा काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा - बेरोजगारीची नो चिंता...रोहित पवार देणार नोकरी

धनश्री मंगेश पालवे (वय 5 रा जेऊर कुंभारी) व प्रगती नितीन आव्हाड( वय 9 रा कोपरगाव बेट)अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत.

जेऊर कुंभारी शिवारातील  कृष्ण मंदिराजवळ महामार्गाचे काम सुरू असून त्यात भराव टाकला जात आहे. भराव टाकल्यामुळे उंचवटा होऊन सदर ठिकाणी  वीज वितरण कंपनीच्या जात असलेल्या अकरा केवी वीज वाहिनी समांतर झाल्या आहेत.

जाणून घ्या - हॅलो, तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तोपर्यंत ती मुंबईहून श्रीगोंद्यात आलेली मुलांसह

कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही.रविवारी २४ मे रोजी  सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास धनश्री मंगेश पालवे ही आपली आत्या सरिता पालवे , प्रगती नितीन आव्हाड ही बहिण साईली आव्हाड या चौघी स्कुटी वरून फिरायला गेल्या होत्या. मयत मुली रस्त्याच्या कडेला उभे असताना एका मुलीचा पाय घसरला ती पडत असताना तिने दुसऱ्या मुलीचा हात धरला तेथून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्या दोघींचा जागेवरच  मृत्यू झाला.

दोन जणी स्कुटीवर असल्यामुळे त्या बचावल्या .समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून रस्त्याची माती मुरूम यांचा भराव टाकून उंची 30 ते 35 फूट करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या विद्युत पोलच्या तारा या रस्त्याच्या समांतर जवळ आल्या आहेत. त्या स्थलांतरित करणे खूप गरजेचे आहे. शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी  घटनास्थळी धाव घेतली.

दोन्हीही मुलींचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. रात्री उशिरापर्यंंत पंचनामा करण्याचे काम चालू होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samrudhi Highway claimed the lives of two girls