
श्रीरामपूर : अवैध वाहतूक करणाऱ्या वाळूतस्करांना मंगळवारी (ता. २८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गौण खनिज व पोलिस पथकावर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न करत महसूलच्या ताब्यातील वाळूचा डंपर पळविला. या दगडफेकीत पोलिस व महसूलचे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. मातुलठाण (ता. श्रीरामपूर) खंडोबा मंदिराजवळ ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात प्रमुख सहा ते सात जणांसह ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.