esakal | गाऱ्हाणे तरी कोणाकडे मांडायचे; ...अशी केली जातेय वाळू चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Sand theft is done in Sangamner taluka due to negligence of administration

प्रशासनाला न जुमानता दिवसाढवळ्या खुलेआम सुरु असलेला वाळू उपसा संगमनेर शहर व तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. जगाला थांबवणारी कोरोनाची महामारीही या तस्करीला आळा घालण्यात अपयश ठरली आहे.

गाऱ्हाणे तरी कोणाकडे मांडायचे; ...अशी केली जातेय वाळू चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : प्रशासनाला न जुमानता दिवसाढवळ्या खुलेआम सुरु असलेला वाळू उपसा संगमनेर शहर व तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. जगाला थांबवणारी कोरोनाची महामारीही या तस्करीला आळा घालण्यात अपयश ठरली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी न बघवणाऱ्या संगमनेरातील वृक्ष परिवाराने आमरण उपोषणाचा इशारा देत, वाळू तस्करी थांबवण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. अनेकदा आर्ज करुनही प्रशासनावर परिणाम होत नसल्याने गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे हा प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिकांना पडला आहे.

अहल्यादेवींच्या काळातील प्राचिन घाट, प्रवरेकाठची वनराई व पुरातन मंदिराच्या परिसरात सकाळ सायंकळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हा वाळूचा खेळ त्रस्त करीत आहे. काही वर्षातील प्रचंड वाळु उपशामुळे संगमनेरच्या नदीपात्रातील खडक उघडे पडू लागले आहेत. रात्रंदिवस वाळु तस्करांच्या टोळ्या नदीपात्रातच तळ ठोकून मोफतच्या गौण खनिजाची लुट करीत आहेत. नदीपात्रात पाणी असतांनाही वाहनांच्या रबरी ट्युबचा वापर करुन भर दिवसा वाळूचोरी सुरु आहे. शासकिय गौणखनिजांचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. संगमनेरच्या पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वृक्ष परिवाराने यासाठी राजकिय धुरिणांसह वाळू तस्करांनाही विनंत्या केल्या. मात्र तरीही परिणाम न झाल्याने, महसुल विभागाला आमरण उपोषणाचे निवेदन देत साकडे घातले आहे. या अनिर्बंध वाळू तस्करीमुळे प्राचिन गंगामाई घाटाचे अस्तित्व धोक्यात येवू पाहत आहे. भंगाराच्या भावात घेतलेल्या निकामी वाहनातून दिवसा, वर्दळीच्या रस्त्याने होणारी वाळू वाहतूक संगमनेरकरांना अस्वस्थ करीत आहे.

या निवेदनावर वृक्ष परिवाराचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र के. मालपाणी, जगदिश आट्टल, प्रकाश गोडगे, विनोद कासट, प्रकाश राठी, गिरीश सोमाणी, ओमप्रकाश आसावा, गणेशलाल बाहेती, राजेंद्रप्रसाद सोमाणी, नंदलाल लोहे, राजगोपाल कलंत्री व अशोक राठी आदी पर्यावरणप्रेमींच्या सह्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image